Monday 22 August 2016

कुठलीही कला शिकायची असेल तर वेळ लागतो पण ती अशक्य नाही..


'यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान'च्या महाराष्ट्र महिला व्यासपीठ विभागातर्फे तसेच ओरिगामी, ठाणे यांच्या सहकार्याने पर्यावरण स्नेही हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन ओरिगामी कागदी कलेचा वापर करुन इको फ्रेंडली पद्धतीने गणेशाची नऊ इंच प्रतिकृती, उंदिर, मोदक व कागदाची फुलांची सजावट शिकविण्याचे प्रशिक्षणाची २२ ऑगस्ट २०१६ पार पडले.  ह्या प्रशिक्षण कार्यक्रमांत अनेक महिलांनी सहभाग नोंदविला होता.




कार्यक्रमाची सुरुवातीला कार्यक्रमाच्या संयोजिका ममता कानडे यांनी ओरिगामी, ठाणे चे रविंद्र प्रधान व त्यांचे सहकारी ( जयंत कायल, प्रकाश सागुरडेकर, विद्याधर म्हात्रे ) यांचा परिचय करुन दिला व महाराष्ट्र महिला व्यासपीठमार्फत राबविलेल्या जाणा-या कार्यक्रम व उपक्रमाची थोडक्यात माहिती करुन दिली. त्यावेळी ओरिगामी, ठाणे चे संस्थापक रविंद्र प्रधान यांनी सांगितले की 'कुठलीही कला शिकायची असेल तर वेळ लागतो पण ती अशक्य नाही', त्यानंतर ओरिगामी, ठाणे यांच्या सहकार्याने महिलांना गणेशाची प्रतिकृती, उंदिर, मोदक बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

या प्रशिक्षणास पार पाडण्यासाठी महाराष्ट्र महिला व्यासपीठाच्या संजना पवार व संगिता गवारे ह्याचे मोलाचे सहकार्य लाभले. २३ ऑगस्ट रोजी दुपारी २ ते ५ हा वेळामध्ये शुल्क ३००/- भरून हे पुढील भाग म्हणजे 'ओरिगामी कागदी फुलांची सजावट' प्रशिक्षण दिले जाणार आहे.

No comments:

Post a Comment