Tuesday 30 May 2017

चित्रपट रसग्रहण कार्यशाळा

चित्रपट रसग्रहण कार्यशाळा 

नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र, नाशिक एम.आय.टी. स्कूल ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन, पुणे आणि पुणे फिल्म फाऊंडेशनच्या यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपट रसग्रहण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. दि.४ जून २०१७ रोजी स.११ ते ०४ या वेळेत डॉ. जब्बार पटेल प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, प्रा. समर नखाते चित्रपट विषयक तज्ञ हे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळा डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वास लॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप.बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक-४२२०१३ य़ेथे होईल. कार्यशाळेत प्रवेश विनामूल्य विनामूल्य असून अधिक संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. संपर्क राजू देसले - 77200 52572 विनायक रानडे-99222 25777

Monday 29 May 2017

विज्ञानगंगाचे सोळावे पुष्प.. 'आधुनिक भारताची विज्ञान क्षेत्रातील प्रगती'

विज्ञानगंगाचे सोळावे पुष्प.. 'आधुनिक भारताची विज्ञान क्षेत्रातील प्रगती'

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 'विज्ञानगंगा' कार्यक्रमांतर्गत सोळावे पुष्प, इस्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे प्राध्यापक डॉ. सुधीर पानसे यांचे 'आधुनिक भारताची विज्ञान क्षेत्रातील प्रगती' या विषयावर शुक्रवारी दिनांक १६ जून २०१७ रोजी सायंकाळी ५ वाजता चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, नरिमन पॉईंट, मुंबई ४०००२१ येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. वरील कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.

Friday 26 May 2017

अभिनय शिबीर संपन्न


अभिनय शिबीर संपन्न 

मुलांच्या शारिरीक आणि मानसिक संवर्धनासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे ८ ते १५ वयोगटातील मुलांसाठी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. योग, संगीत, नृत्य, ओरिगामी, संगणक, व्हिडिओ फिल्म निर्मिती, अभिनय कथाकथन, संवादकौशल्य या विषयांवर मुलांना शिबीरात माहिती देण्यात आली. शुक्रवारी नृत्य या विषयावर सीमा पेंडसे यांनी मुलांना मार्गदर्शन केले. नृत्य शिकण्यासाठी अधिक मुलांची उपस्थिती होती. 

Saturday 20 May 2017

महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे
मुलांना 'चलचित्र संकलना'चे धडे...





यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई व महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे लहानमुलांसाठी चलचित्र संकलनाविषयीचे ( व्हिडिओ एडिटिंग )  शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे चलचित्र संकलनाची कला शिकण्यासाठी मुले अधिक संख्येने उपस्थित होते. प्रितम वामन यांनी उपस्थितांना चांगले मार्गदर्शन केले.

वामन यांनी सुरुवातीला चित्रपट तयार कसा करतात याची संपूर्ण माहिती सांगितली. त्यानंतर चित्रपट तयार करताना कॅमे-यांचे काम खूप महत्त्वपूर्ण असते. शॉर्ट फिल्म आणि फिल्म याची माहिती दिली. वामन यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थिचे ग्रुप करून कॅमे-यांचे प्रकार आणि संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर त्यांनी छोट्या छोट्या कथा घेऊन चित्रपट कसा तयार केला जातो, हे मुलांना उदाहरणासहित दाखविले.

Friday 19 May 2017

शेती सुधारणा क्षेत्रात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर

शेती सुधारणा क्षेत्रात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर 

शेतीतील सुधारणांच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य देशात अन्य राज्याच्या तुलनेत विविध निकषांवर 81 टक्के गुण मिळवून आघाडीवर आहे, असे प्रशस्तीपत्र खुद्द निती आयोगाने दिले आहे.
भारतीय लोकप्रशासन संस्था, महाराष्ट्र विभागीय शाखा आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यान - २०१७’ मध्ये ‘व्हिजन ऑफ निती आयोग फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया’ या विषयावर निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी राज्याचे मुख्य सेवा हक्क आयुक्त तथा भारतीय लोकप्रशासन संस्थेचे महाराष्ट्र शाखेचे मानद अध्यक्ष स्वाधीन क्षत्रिय, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सचिव एस.जी.काळे आदी उपस्थित होते.
कांत यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या हितासाठी शेती सुधारणेचा कार्यक्रम निती आयोगाने गेल्या वर्षी ३१ ऑक्टोबर रोजी सुरू केला. त्यात कृषी उत्पन बाजार समित्यांच्या कार्यपद्धतीत सुधारणा, जमीन भाडेपट्टी सुधारणा, खाजगी जमिनींवर वृक्ष लागवड अशा विविध उपक्रमांचा समावेश होता. या सर्व बाबतीत महाराष्ट्र सर्वप्रथम क्रमांकावर आहे.
 कांत म्हणाले की, भारताचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपीचा) दर १० टक्क्यांपर्यंत आणि दरडोई उत्पन्न 6 हजार ८०० अमेरिकन डॉलरपर्यंत वाढवून भारताला गरिबीमुक्त देश बनविण्याचे उद्दिष्ट निती आयोगाने ठेवले आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) मधील महिलांचे योगदान वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. जगभरातील महत्त्वाच्या देशामध्ये जीडीपीमधील महिलांचे योगदान ४० टक्के असताना भारतात हे प्रमाण केवळ १७ टक्के एवढे आहे, ते वाढविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यासाठी  १५ वर्षाचे व्हिजन डॉक्युमेंट आणि ७ वर्षांचा धोरण आराखडा, तीन वर्षाच्या कृती आराखडा निती आयोगाकडे तयार आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यात भारतातील तरुणाईचे मोठे योगदान राहणार आहे. जग वृद्धत्त्वाकडे झुकत असताना भारतात कार्यक्षम तरुणाई मोठ्या प्रमाणात आहे आणि हेच विकासाच्या वाटेवरील आपले सर्वात मोठे भांडवल ठरणार आहे. स्टार्टअप क्षेत्रात भारतीय तरुणांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.  शिक्षण, आरोग्य, कृषी यासारख्या क्षेत्रातील वेगवेगळे स्टार्टअप देशाच्या विकासात महत्त्वाचे योगदान देत आहेत. आयआयटी सारख्या शैक्षणिक संस्थेमधून उत्तीर्ण झालेले ३७ टक्के विद्यार्थी हे स्टार्टअपमध्ये करिअर घडवित आहे हे चित्र आशादायक आहे.
ते पुढे म्हणाले की, देशातील शिक्षण व आरोग्य क्षेत्रात मुलभूत कामगिरी होणे आवश्यक आहे. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील सुधारणांशिवाय विकासाचे स्वप्न साध्य करता येणार नाही. जगभरातील उत्पादन पद्धती बदलत असून जगभरात तंत्रज्ञानाधारित उत्पादन पद्धतीचा स्वीकार होत असताना आपणही त्याबाबतीत मागे राहता कामा नये. तंत्रज्ञानामुळे रोजगार कमी होतील ही भीती अनाठायी असून रोजगार संधी वाढतील फक्त त्यांचे स्वरूप बदलेल. तंत्रज्ञान हे भारताच्या विकासातील सर्वात महत्त्वाचे साधन ठरेल. पुढच्या तीन ते चार वर्षात भारत कॅशलेस व्यवहारांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात आघाडी घेऊन विकासाचे निर्धारित लक्ष साध्य करण्याच्या दृष्टीने योग्य ती पावले टाकेल.

Wednesday 17 May 2017

ज्येष्ठ क्रीडा मानसतज्ज्ञ भीष्मराज पुरुषोत्तम स्मृतीसभा

ज्येष्ठ क्रीडा मानसतज्ज्ञ भीष्मराज पुरुषोत्तम स्मृतीसभा

ज्येष्ठ क्रीडा मानसतज्ज्ञ आणि निवृत्त विशेष पोलिस महानिरिक्षक भीष्मराज पुरुषोत्तम बाम यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी शुक्रवारी १२ मे रोजी २०१७ नाशिक येथे हदय विकाराने निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे मंगळवारी २३ मे रोजी सायंकाळी ५ वाजता प्रतिष्ठानच्या जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग येथील रंगस्वर सभागृहात प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. शरदरावजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली स्मृतिसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
मा. बाम पोलिस महासंचालक पदावरुन निवत्त झाल्यानंतर त्यांना एका दुखापतीला सामोरे जावे लागले. त्या दुखापती दरम्यान आराम करीत असताना त्यांच्या वाचनात रशियन पुस्तके आली. त्यात एका पुस्तकात, 'आपले मन हाच शत्रू' हे वाक्य त्यांना अधिक भावले. या वाक्यामुळेच ते क्रीडा मानसोपचाराकडे वळले. मा. बाम स्वत: एक उत्कृष्ट नेमबाज असून, ते योग आणि मन यांचा क्रीडाक्षेत्राच्या दृष्टीकोनातून अभ्यास करीत असत. त्यांनी क्रीडा मानसोपचाराचा रीतसर अभ्यासक्रमही पूर्ण केला. काही खेळाडूंच्या कामगिरीत त्यांनी दिलेल्या सल्ल्यानूसार फरक पडत गेल्याने दिग्गज खेळाडू त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊ लागले.
मा. बाम यांनी १९८९ मध्ये नाशिक येथे नेमबाजीची क्रीडा प्रबोधिनी स्थापन करुन त्याद्वारे अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय नेमबाज घ़डविले. नेमबाजीला प्रोत्साहन देण्यासाठी मा. बाम यांनी एक्स. एल. टारगेट शूटर्स असोसिएशनची स्थापना केली. ते पुरुषोत्तम अकॅडमीचे संस्थापक, पुण्याच्या चाणक्य मंडळाचे विश्वस्त व मार्गदर्शक, योगी विद्या धामच्या योगकुलगूरु विभागात अध्यापक म्हणून त्यांनी काम केले. मा. भीष्मराज पुरूषोत्तम बाम आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई तसेच प्रतिष्ठानचे मा. अध्यक्ष श्री. शरदरावजी पवार यांचा घनिष्ठ संबंध होता. कार्यक्रमाला अधिक संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे. 

ठाणे विभागाचा वार्षिक अहवाल ...

ठाणे विभागाचा वार्षिक अहवाल ...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, ठाणे केंद्र, १ एप्रिल २०१७ पासून अस्तित्वात आले. त्यावेळी उद्घाटनाचा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई सरचिटणीस शरद काळे यांच्या हस्ते पार पडला. त्यानंतर काव्यसंमेलन झाले
.
ठाणे प्रतिष्ठानने यशस्वी रितीने राबविलेले उपक्रम पुढीलप्रमाणे :
२९ जुलै २०१६ रोजी ज्येष्ठ नाटककार श्री. अशोक समेळ यांची ज्येष्ठ कवी श्री. अशोक वागवे यांनी खुमासदार मुलाखत घेतली. यावेळी अशोक समेळांनी नटसम्राटमधील एक उच्चांकाचा प्रवेश करून दाखवला. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती सुभाष शेंडे यांची मुलाखत प्रा. नितीन आरेकरांनी घेतली.
१५ ऑगस्टच्या मुहूर्तावर ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना यशवंतराव चव्हाण साहेबांच्याबद्दल व त्यांच्या कार्याचा परिचय ठाणे महानगर पालिकेचे उपायुक्त श्री. मनिष जोशी आणि प्रा. नितिन आरेकरसरांनी आपल्या व्याख्यानातून करून दिला.ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ३० सप्टेंबरच्या सायंकाळी मा. श्री. जी. वी. पिंगुळकर यांच्या अध्यक्षतेखाली ठाण्यातील विविध क्षेत्रीतील ६ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला होता. त्यानंतर डॉ. सौ. मृदुला दाढे जोशी सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त २५ नोव्हेंबर रोजी मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने मुंबई विद्यापीठाच्या दिक्षांत सभागृहात 'यशवंत व्याख्यानमाला' या उपक्रमाची सुरूवात झाली. या उपक्रमाची सुरूवात प्रसिध्द शास्त्रज्ञ पदमविभूषण डॉ. श्री. अनिल काकोडकर यांच्या 'मुलभूत विज्ञानाच्या संशोधनाच्या नव्या दिशा' या व्याख्यानाने झाली. मुंबई विद्यापिठाच्या अखत्यारीतील असलेल्या महाविद्यालयातील सुमारे ५५० ते ६०० विद्यार्थ्यांना या व्याख्यानाचा लाभ मिळाला. यावेळी पदमश्री मधु मंगेश कर्णिक, अरूण साधू, प्रा. पु. द. कोडोलीकर संपादित अनघा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ' यशवंतराव चव्हाण : जडण घडण' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
१७ फेब्रुवारी २०१७ रोजी विचारकुंकू या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याच्या निवृत्त पहिल्या स्त्री राज्य निवडणूक आयुक्त श्रीमती नीला सत्यनारायण यांची खुमासदार मुलाखत प्रा. अनुया धारप व कु. पूजा प्रधान यांनी घेतली. या प्रदिर्घ मुलाखतीमुळे महिला वर्गाला श्रीमती नीला सत्यनारायण याचा प्रदिर्घ शासकीय अनुभवाची तसेच त्यांच्या साहित्यातील योगदानाची आणि त्यांच्या विविध उपक्रमांची माहिती मिळाली. मुलाखतीनंतर सौ. माधवी घारपुरे यांच्या कथाकथनाचा कार्यक्रम रंगला

Sunday 14 May 2017

यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यान...

यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यान...

'भारतीय लोक प्रशासन संस्था, महाराष्ट्र विभागीय शाखा, मुंबई' व 'यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई' यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार १९ मे रोजी 'यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यान २०१७' आयोजित करण्यात आले आहे. निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांचे ' भारताच्या परिवर्तनासाठी नीती आयोगाचा दृष्टिकोन' या विषयावर भाषण होणार आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या रंगस्वर सभागृहात सायंकाळी साडेचार वाजता होणारा आहे हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

तापमान वाढ आणि पावसाचा काही संबंध नाही - कृष्णानंद होसाळीकर

तापमान वाढ आणि पावसाचा काही संबंध नाही - कृष्णानंद होसाळीकर

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञानगंगाचे पंधरावे पृष्प 'बदलते हवामान आणि यंदाचा पावसाळा' याविषयीचे व्याख्यान भारतीय हवामान पश्चिम विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिले. त्यांनी व्याख्यानात सुरुवातीला भारतामध्ये झालेले भुकंप व दृष्काळ याविषयी सविस्तर व सखोल माहिती दिली तसेच सूर्यापासून येणारे किरण, तापमानातील धुळीचे कण, सुर्यावरील डाग यामुळे पृथ्वीच्या तापमानावर परिणाम होत असतो असे त्यांनी सांगितले तसेच तापमान वाढीशी पावसाचा काही संबंध नाही असेही त्यांनी सांगितले तसेच यंदाचा पावसाळा याविषयी त्यांनी कोकण व गोवा ९६% LPA ( दिर्घकालीन सरासरी), मध्य महाराष्ट्रात ९८% LPA, मराठवाडा ९९% LPA, विदर्भात ९६% LPA असा पाऊस पडण्याची शक्यता एप्रिल मध्ये वर्तविण्यात आली आहे तसेच पुढील अंदाज जूनच्या पहिल्या आठवड्यात अधिक सखोल अंदाज वर्तविला जाईल असे त्यांनी सांगितले. याविषयीची अधिक माहिती हवामान खात्यांच्या संकेतस्थळावरुन आपणास वेळोवेळी दिली जाईल. यावेळी अभ्यासकांच्या प्रश्ना कृष्णानंद होसाळीकर यांनी अचूक उत्तर दिली.

Saturday 6 May 2017

चित्रपट चावडीतर्फे 'अजात’चित्रपट



औरंगाबाद : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबाद व एम.जी.एम. जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागाच्या वतीने दरमहा राबविण्यात येणा-या चित्रपट चावडी या उपक्रमांत या महिन्यात अरविंद गजानन जोशी यांनी दिग्दर्शित केलेला तसेच ऑकलंड येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झालेल्या ‘अजात’ हा माहितीपट शनिवार, दि. १३ मे २०१७ रोजी संध्या ५.३० वाजता एम. जी. एम. ज्या आइन्स्टाइन सभागृहात दाखविण्यात येणार आहे. नुकताच ‘ या आंतरराष्ट्रीय ऑनलाईन चित्रपट महोत्सवात ‘अजात’ साठी अरविंद जोशी यांना ‘अवार्ड ऑफ मेरिट’ मिळालाय. हा महोत्सवात उल्लेखनिय कामगिरी करणारा ‘अजात’ हा एकमेव भारतीय माहितीपट आहे. यावेळी माहितीपटाचे दिग्दर्शक अरविंद जोशी व त्यांचे सहकारी सत्यपालसिंह राजपूत हे याप्रसंगी उपस्थित राहून रसिकांसमवेत संवाद साधनार आहेत. 
विदर्भातील मंगरूळ दस्तगीर (ता. चांदूर, जि. अमरावती) येथील गणपती महाराज यांच्या जीवनावर आधारलेला हा माहितीपट आहे. सुमारे १०० वर्षापूर्वी गणपती महाराजांनी विधवेशी आंतरजातीय विवाह केला होता. त्यांनी आपल्या शिष्यांनाही आंतरजातीय विवाह करण्याचे आदेश दिले. मंदिरप्रवेश, एकत्रित काला, स्त्रिमुक्ती अशी अनेककामे त्यांनी त्याकाळी केली. स्त्रियांना पितृसत्ताक दास्याचे प्रतिक असलेले कुंकू पुसून टाकायला सांगितले. विवाहीत स्त्रियांना मंगळसुत्र, बांगड्या काढून टाकायला सांगीतल्या. त्यांनी मुर्तिपुजेलाही विरोध केला. वर्चस्ववादी धर्मव्यवस्थेला विरोध करून ‘अजात’ पंथ गणपती महाराजांनी उभा केला. ‘अजात’ पंथाच्या विदर्भातील अनेक गावात पालखी निघायच्या. अजात पंथीय लोक गरीब आहे. त्यामुळे गणपती महाराजांच्या कार्याचे ऐतिहासीक दाखले मिळत नाही. अशा गणपती महाराजांचे कार्य म्हणजे महाराष्ट्रातील जातीअंताच्या लढाईचे एक ‘अज्ञात’ पर्व होय. 
या माहितीपटाची निर्मिती करण्यापूर्वी अरविंद गजानन जोशी यांनी आपल्या मित्रांसमवेत विदर्भातील अनेक ग्रामिण भागात जाऊन तेथे गणपती महाराजांविषयी माहिती जमा केली. महाराजांच्या अनुयायांनी गायलेले भजने व पंढरपूर येथे मिळालेले भजनाचे संगीतच या माहितीपटासाठी वापरलेले आहे.
चित्रपट चावडी या उपक्रमाअंतर्गत हा सिनेमा सर्वांसाठी मोफत असून जास्तीत जास्त चित्रपट रसिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानच्या औरंगाबाद केंद्राचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, कोषाध्यक्ष सचिन मुळे, सचिव मुकुंद भोगले, नीलेश राऊत, डॉ. अपर्णा कक्कड, डॉ. रेखा शेळके, सुबोध जाधव, मंगेश निरंतर,गणेश घुले, श्रीकांत देशपांडे, महेश अचिंतलवार, त्रिशुल कुलकर्णी आदींनी केले आहे.

Thursday 4 May 2017

चित्रपटप्रेमींसाठी युलीसेसेस गेझ

चित्रपटप्रेमींसाठी युलीसेसेस गेझ

नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विडास को-ऑफ. बँक लि. नाशिक विडास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बॅंक व रेडिओ विडास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपट चावडी उपक्रमांतर्गत शुक्रवार ५ मे २०१७ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिध्द गायक ग्रीस दिग्दर्शक थिओ अॅन्जेलोपूओलॉप यांचा युलीसेसेस गेझ हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अॅण्ड ट्रेनिंग हब ठाकूर रेसिडेन्सी, विडास को-ऑप बँकेसमोर सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक-४२२०१३ येथे दाखिवण्यात येणार आहे. चित्रपट पाहण्यास नाशिकच्या रसिकांनी अधिक उपस्थित रहावे असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे. 

Wednesday 3 May 2017

विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन

विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन 

नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मे महिन्याच्या कालावधी मध्ये विद्यार्थ्यांसाठी क्लब हाऊस (विश्वास लॉन्स) ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑफ बँकसमोर  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 
नूकतीच बालनाट्य शिबीराला सुरूवात झाली असून गुरूवारी ११ मे रोजी दुपारी १२ ते ४ या वेळेत पतंग तयार करणे व शुक्रवारी १२ मे रोजी दुपारी १२ ते ४ या वेळेत पझल्स तयार करणे याबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून हेमंत नाखरे मार्गदर्शन करणार आहेत. सोमवारी १५ मे रोजी सकाळी १० ते ४ या वेळेत ओरिनामी कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेला हेमंत चोपडे मार्गदर्शन करतील. बुधवारी १७ मे रोजी सकाळी १० ते ४ या वेळेत कॅलिग्राफी कार्यशाळा होणार असून चिंतामण पगारे आणि निलेश गायधनी हे मार्गदर्शन करणार आहेत. मंगळवारी २३ आणि २४ मे ला दुपारी ४ ते ७ या कालावधी मध्ये मैत्री गणिताशी या विषयावर हेमंत चोपडे मार्गदर्शन करणार आहेत.  गुरूवारी २५ ते सोमवारी २९ मे सकाळी १० ते ३ या वेळेत व्यक्तीमत्त्व विकास व नाट्य या विषयावर संजय हळदीकर, कोल्हापूर हे मार्गदर्शन करतील. शनिवारी २७ मे गजल लेखन कार्यशाळा होणार असून नितिन देशमुख आणि अरूण सोनवणे मार्गदर्शन करतील. ३० व ३१ मे ला सिनेमा कसा बघावा याबाबत समर नखाते (पुणे) हे मार्गदर्शक करणारं आहेत.  

Tuesday 2 May 2017

चित्रपट चावडीतर्फे 'अजात' डोक्यूमेंटरी

चित्रपट चावडीतर्फे  'अजात' डोक्यूमेंटरी


औरंगाबाद : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, औरंगाबाद विभागीय केंद्र, एमजीएम जनसंवाद व वृत्तपत्रविद्या महाविद्यालयातर्फे अजात डोक्यूमेंटरी दाखवण्यात येणार आहे. सर्वांना प्रवेश विनामुल्य असून १३ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता आईनस्टाईन हॉल, जेएनईसी महा. एमजीएम परिसर, औरंगाबाद या ठिकाणी डोक्यूमेंटरी दाखविली जाईल.