Friday 16 June 2017

'विज्ञानगंगा'चे सोळावे पुष्प संपन्न...

'विज्ञानगंगा'चे सोळावे पुष्प संपन्न...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 'विज्ञानगंगा' कार्यक्रमांतर्गत सोळावे पुष्प, इस्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे प्राध्यापक डॉ. सुधीर पानसे यांनी 'आधुनिक भारताची विज्ञान क्षेत्रातील प्रगती' या विषयावर नूकतेच चव्हाण सेंटरमध्ये आधुनिक भारताच्या विज्ञान क्षेत्रातील प्रगतीमध्ये मेघनाद साहा, दामोदर कोसंबी, शांतीस्वरूप भटनागर, होमी भाभा यांचे मोलाचे योगदान कसे होते ते स्पष्ट केले.
सुरूवातीच्या काळात इंग्रज विज्ञान क्षेत्रात प्रबळ आपल्यामुळेच आपल्यावर राज्य करतात, हे कलकत्ता वासियांच्या लक्षात आले, आणि त्यांनी त्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरूवात केली. त्यानंतर भारतामध्ये संशोधनाच्या हेतूने कलकत्ता, लाहोर आणि अलाहबाद अशी तीन विद्यापीठ सुरू करण्यात आली अशी माहिती पानसे यांनी सांगितली. त्यानंतर मेघनाद साहा, दामोदर कोसंबी, शांतीस्वरूप भटनागर, होमी भाभा यांची शिक्षणं परदेशात कशा पध्दतीनं झाली. तसेच विविध शास्त्रज्ञांनी कशा पध्दतीने प्रगतीमध्ये हातभार लावला. पहिले महायुध्द, दुसरे महायुध्द आणि विज्ञान अशा ब-याच गोष्टी सांगून उपस्थितांना खूश केले.
होमी भाभा यांनी घरच्यांच्या आग्रहाखातर परदेशात अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले, त्यानंतर त्यांनी भैतिकशास्त्राचा अभ्यास पुर्ण केला. काही महिन्यांच्या सुट्टीसाठी ते भारतात आले असता, परत निघणार त्याचवेळेस दुस-या महायुध्दाला सुरूवात झाली. आणि ते भारतात अडकले, दुस-या महायुध्द सहा वर्ष चालले आणि ते येथील संशोधनात पुर्णपणे गुंतून गेले त्याचा खूप मोठा फायदा आपल्या देशाला झाला. हे उदाहरण त्यांनी आवर्जून सांगितले. 

No comments:

Post a Comment