Sunday 5 November 2017

जीएसटी कायद्या मध्ये जागतिक विक्रम ठरावा इतक्या दुरुस्त्या



जीएसटी कायद्या मध्ये जागतिक विक्रम ठरावा इतक्या दुरुस्त्या आत्तापर्यंत झाल्या आहेत, व करत राहाव्या लागणार आहेत. हट्टीपणा व श्रेय घेण्यासाठी उतावळेपणा यातून हे घडते आहे, असं मतं अर्थविषयक सल्लागार अजित जोशी यांनी नूकतेच झालेल्या  कार्यक्रमामध्ये व्यक्त केले.
 यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - विभागीय केंद्र कोकण, ठाणे आणि युवाराज प्रतिष्ठान, बदलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने “जीएसटी - काही अनुक्तरीत प्रश्न” यावर आयोजित केलेल्या विशेष व्याख्याना मध्ये ते बोलत होते.
सरकारने जीएसटी कायद्याची अंमलबजावणी अत्यंत अनावश्यक घाईने व पुरेश्या नियोजना अभावी करण्याचा प्रयत्न केला आहे. योग्य सॉफ्टवेअर सुद्धा तयार करण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. त्याचा परिणाम असंघटीत छोट्या उद्योग धंद्यांवर विपरीत झाला आहे. असंही ते यावेळी म्हणाले.
जेष्ठ पत्रकार सुनिल तांबे यांनी इतर अनेक देशातील(सिंगापूर ते ब्राझील ) जीएसटी च्या अंमलबजावणीची उदाहरणे देऊन आपल्या देशातील अंमलबजावणी मधील दोष व त्रुटी मांडल्या. अमेरिकेत जीएसटी का लागू करण्यात आला नाही, हेही उदाहरणे देऊन स्पष्ट केले. आणि  भारतात लागू करण्यातील अडचणी व अडथळे समजावून सांगितले. याबाबत उद्योग व व्यवसायनुसार परिषदा घेऊन चर्चा घडवून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे त्यांनी आवाहन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन आशिष दामले केले होते. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिन पाटील यांनी केले. या कार्यक्रमाला दत्ता बाळसराफ, सुनिल तांबे आणि पद्मभूषण देशपांडे हे मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment