Tuesday 30 January 2018

'विज्ञानगंगा'चे चोविसावे पुष्प...'हृदयरोपण'



यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 'विज्ञानगंगा' कार्यक्रमांतर्गत चोविसावे पुष्प मुलुंडच्या फोर्टिज हॉस्पिटलमधील शल्यविशारद डॉ. अन्वय मुळे मराठीतून 'हृदयरोपण' या विषयावर दिनांक १६ फेब्रुवारी २०१८ रोजी सायंकाळी ५ वाजता चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर नरिमन पॉईंट, मुंबई येथे गुंफणार आहेत. तरी वरील कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे ही विनंती.

Thursday 18 January 2018

उद्या पासून बहुचर्चित ‘८वा’ यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव


मुंबई- बहुचर्चित यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१८, शुक्रवार १९ जानेवारीपासून सुरु होणार आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई आणि पुणे फिल्म फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव रंगणार आहे. प्रतिष्ठानच्या चव्हाण सेंटर मध्ये प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत हा उदघाटन सोहळा पार पडणार आहे. यावेळी चित्रपट दिग्दर्शक व निर्माता रमेश सिप्पी यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल गौरविण्यात येणार आहे. तसेच या महोत्सवात प्रतिष्ठान महोत्सवाचे संचालक जब्बार पटेल, सरचिटणीस शरद काळे, कोषाध्यक्ष हेमंत टकले, मिडिया सल्लागार नितीन वैद्य मुख्य समन्वयक महेंद्र तेरेदेसाई, समन्वयक संजय बनसोडे, यांची उपस्थित असणार आहे.
यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१८ महोत्सवाचे यंदा ‘८ वे’ वर्ष आहे. या महोत्सवा दरम्यान भारतीय चित्रपटसृष्टीत मोलाचं योगदान देणाऱ्यास गौरविण्यात येते. आतापर्यंत पंकज कपूर ,अनुपम खेर, वहिदा रेहमान सारख्या दिग्गज कलाकारांना गौरविण्यात आले आहे.
यंदा या महोत्सवात चित्रपट रसिकांसाठी विविध भाषेतील आणि विविध देशातील काही निवडक ८५ चित्रपटांची मेजवानी आहे. महोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेले ’स्मिता पाटिल स्मृती व्याख्यान’अभिनेते सचिन खेडेकर यांच्याशी गप्पा २० जानेवारी सायंकाळी ५ वाजता. होणार आहे,
तसेच मोहन क्रिशनन यांचा मास्टर क्लास ‘पोस्ट प्रोडक्शन' या विषयावर २३ जानेवारी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. २२ जानेवारीला सुश्रुत वैद्य हे हिंदी चित्रपटातील गाण्यामधील सामाजिक उत्क्रांतीचे प्रतिबिंब या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत. १९ जानेवारी ते २५ जानेवारी दरम्यान मुंबईकरांना जगभारतील विविध भाषातील नावाजलेले चित्रपट पाहता येणार आहे. चीन, रशिया, फ्रान्स, इराण, बेल्जियम, अर्जेंटिना, इस्त्रायल, तुर्की, चिली आदी देशांतील चित्रपट एकाच ठिकाणी पाहण्याची सुवर्णसंधी सर्वासाठी यशवंत चित्रपट महोत्सवाने उपलब्ध करुन दिली आहे. अशी माहिती महोत्सवाचे मुख्य समन्वयक महेंद्र तेरेदेसाई यांनी दिली.

Wednesday 17 January 2018

तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी जाणीवजागृती मोहीम सुरु

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि विकास अध्ययन केंद्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांसाठी Transgender Sensitization Training programme भांडूप येथील पवार पब्लिक स्कूल मधील शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमामध्ये विकी शिंदे, माधुरी सरोदे आणि रेणुका कड यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले.
शिक्षकांना त्यांचे प्रश्न विचारायला सांगून, सर्व प्रश्नांचे निराकरण करण्यात मान्यवरांनी केले. तसेच तृतीयपंथींच्या सर्व प्रश्नांवर शिक्षकांसोबत चर्चा करण्यात केली. चर्चेमुळे शिक्षकांच्या मनातील शंका दूर झाल्याचे सुमा दास यांनी सांगितले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक आणि कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Tuesday 16 January 2018

सुप्रिया सुळे यांच्य़ा हस्ते सामाजिक क्षेत्रात काम करणा-या महिलांचा सत्कार



यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या ठाणे विभागीय केंद्रातर्फे 'विचारकुंकू' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे विचारकुंकू कार्यक्रमामध्ये प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा मा. सुप्रिया सुळे यांची मुलाखत प्रा. नितिन आरेकर घेणार असून सामाजीक क्षेत्रात काम करण्या-या महिलांचा सत्कार सुध्दा मा. सुप्रिया सुळे यांच्य़ा हस्ते करण्यात येणार आहे.

एकविसाव्या शतकात मकर संक्रांतीच्या पारंपारिक सणाला नवं वळण देणं आवश्यक आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनाही परंपरेला नवं वळण देणं आवडत असे. याच दृष्टीकोनातून ठाणे केंद्राच्या वतीने गुरूवारी २५ जानेवारीला सकाळी १०. ३० वा. नरेंद्र बल्लाळ सभागृह, पहिला मजला, महानगरपालिका ठाणे येथे विचारकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमामध्ये सौ. रूपा देसाई जगताप, सौ. भारती मोरे, सौ. उषा मजिठीया, डॉ. सौ. पद्मा देशमुख आणि श्रीमती कांताबाई विचारे या सर्व सामाजिक क्षेत्रात काम करणा-या महिलांचा सत्कार कार्याध्यक्षा मा. सुप्रिया सुळे हस्ते करण्यात येणार आहे. ठाणे केंद्राचे सचिव अमोल नाले, अध्यक्ष मुरलीधर नाले आणि उपाध्यक्ष महेश केळुस्कर यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन लोकांना केले आहे. 

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि विकास अध्ययन केंद्र मुंबई यांच्यावतीने तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी जाणीवजागृती मोहीम सुरु ...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि विकास अध्ययन केंद्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांसाठी Transgender Sensitization Training programme राज्यात पहिल्यांदा आयोजित करण्यात आला आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये पवार पब्लिक स्कूल, कासा रिओ, पालवा, शिक्षक आणि कर्मचारी यांची उपस्थिती होती.या प्रशिक्षण शिबीरात तृतीयपंथी माधुरी सरोदे, विकी शिंदे, मुख्याध्यापिका इशिता चौधरी, शारदा मॅडम आणि किशोर सर इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होती. विशेष म्हणजे उद्याचा कार्यक्रम पवार पब्लिक स्कुल भांडुप वेस्ट येथे २.३० ते ४ यावेळेत होईल.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि विकास अध्ययन केंद्र मुंबई यांच्यावतीने तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी जाणीवजागृती मोहीम सुरु


तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी शिक्षक  हा समाजातील खूप महत्वाचा घटक आहे. यासाठी   यशवंतराव   चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई  आणि विकास अध्ययन केंद्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांसाठी Transgender Sensitization Training programme आयोजित करण्यात आला होता. राज्यातील शिक्षकांसाठी अशा पद्धतीचे हे पहिलेचं ट्रेनिंग होते. ह्या उपक्रमाची सुरुवात आज पवार पब्लिक स्कूल, कांदेवली, मुंबई येथे नूकतीच झाली. याप्रशिक्षण कार्यक्रमात पवार पब्लिक स्कूलचे सर्व शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.  या प्रशिक्षणात तृतीयपंथी माधुरी सरोदे-शर्मा, विकी शिंदे, पवार पब्लिक स्कूलचे व्यवस्थापक श्री हेगडे सर, प्राचार्य रेवती मॅडम उपस्थित होत्या. हाच उपक्रम १६ जानेवारी १०१८ रोजी (आज) पवार पब्लिक स्कूल, डोंबिवली येथे २.३० ते ४.०० या वेळेत आयोजित केला आहे.

Monday 15 January 2018

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा सामाजिक व क्रीडा पुरस्कार २०१७’ संपन्न



यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या नवमहाराष्ट्र युवा अभियानातर्फे दरवर्षी दिल्या जाणा-या ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा सामाजिक व क्रीडा पुरस्कार २०१७’ चा सोहळा कल्चरल सेंटर, सिंह्गड इन्स्टिट्यूट कॅम्पस, सिंह्गड रोड, वडगाव, पुणे येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रतिष्ठानच्या कार्याध्य़क्षा सुप्रिया सुळे, श्री. अजित निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पुरस्काराचे यंदाचे एकोणिसावे वर्ष असल्याने कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी होती.

सन २०१७ सालचा‘यशवंतराव चव्हाण विशेष युवा क्रीडा पुरस्कार’ भारतीय हॉकीपटू आकाश चिकटे (हॉकी), तर या वर्षीचा ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा क्रीडा पुरस्कार – युवक व युवती’ क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल मोहम्मद नुबैरशेख (बुद्धिबळ) व किशोरी शिंदे (कबड्डी) यांना तर सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सतीश सिडाम (ताडोबा वनक्षेत्रात आदिवासी हक्कासाठी कार्यरत) व कृपाली बिडये (हिजडा आणि ट्रान्सजेन्डर समूहासाठी कार्यरत)यांना ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा सामाजिक पुरस्कार, सर्व पुरस्कार प्रतिष्ठानच्या कार्याध्य़क्षा सुप्रिया सुळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची स्थापणा झाल्यापासून समाजातल्या वेगवेगळ्या घटकांसोबत काम करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत असतो. तसेच कै. यशवंतराव चव्हाण साहेबांची अपूरी राहिलेली स्वप्नं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मागील ३० वर्षांपासून महाराष्ट्रातल्या सगळ्या घटकांसोबत राहून करण्याचा प्रयत्न करत आहे, असे प्रतिष्ठानच्या कार्याध्य़क्षा सुप्रिया सुळे सांगितले. नंतर ताईंनी शिक्षण क्षेत्रात प्रथम नामक संस्थेचा उल्लेख करून त्यांच्या कार्याचे कौतूक केले.  

Friday 12 January 2018

राजमाता जिजाऊंच्या जयंतीदिनी दिव्यांग कट्ट्याचे उद्घाटन

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या अपंग हक्क विकास मंचतर्फे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून दिव्यांग कट्ट्याचे उद्घाटन प्रतिष्ठानचे लेखाधिकारी श्री. महेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. अशी माहिती अपंग हक्क विकास मंचाचे संघटक शमीम खान यांनी दिली, मंचाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल चाळके आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी कार्यक्रमाला उपस्थित होते.

विज्ञानगंगाचे तेविसावे पुष्प संपन्न

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 'विज्ञानगंगा' कार्यक्रमांतर्गत तेविसावे पुष्प, शास्त्रज्ञ प्रा. मंदार देशमुख यांचे ‘नॅनोटेक्नोलॉजी या विषयावर या विषयावर यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये दिनांक १२ जानेवारी २०१८ रोजी पार पडले. या कार्यक्रमाला मुंबईतील अधिक विज्ञान प्रेमींची उपस्थिती होती. विशेष म्हणजे मंदार देशमुख यांनी विषयाशी निगडीत एकादी गोष्ट सांगितल्यानंतर लगेच त्यावर प्रश्न विचारले, त्याने लोकांचा उत्साह अधिक वाढला.

‘नॅनोटेक्नोलॉजी म्हणजे नेमकं काय ? त्याचे फायदे-तोटे, उपयोग कशासाठी केला जातो, हे सर्व देशमुख यांनी उपस्थितांना सांगितले. आपल्या वर्तमानकाळात, भूतकाळात आणि भविष्यकाळात त्याचा कसा उपयोग होतो किंवा होईल हेही त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमाचा विडिओ ycp100 या फेसबुक पेजवरती उपलब्ध आहेत.

Sunday 7 January 2018

तृतीयपंथी समुदायासाठी लवकरच राज्यस्तरीय कार्यशाळा

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा मा. सुप्रियाताई सुळे यांच्या अध्यक्षेतेखाली तृतीयपंथी समुदायाच्या प्रतीनिधीसोबत आज बैठक पार पडली. बैठकीमध्ये त्याच्या समस्या आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लवकरच राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात येईल असे आश्वासन मा. सुप्रियाताई सुळे यांनी दिले.

‘चित्रपट चावडी’ यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे चित्रपटप्रेमींसाठी शनिवारी ‘द स्वीट हिअर आफ्टर’

नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शनिवार 6 जानेवारी 2018 रोजी सायंकाळी 6.30 वाजता सुप्रसिद्ध कॅनेडियन दिग्दर्शक अ‍ॅटम एगोयान यांचा ‘द स्वीट हिअर आफ्टर’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वासलॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप.बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक-422013 येथे दाखविण्यात येणार आहे.

कॅनेडियन दिग्दर्शक अ‍ॅटम एगोयान यांना भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2017 मध्ये जीवनगौरव हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. इजिप्शीयन आर्मेनियन वंशाचे एगोयान कॅनेडातील तसेच जागतिक पटलावरचे महत्त्वाचे दिग्दर्शक मानले जातात.

‘द स्वीट हिअर आफ्टर’ ह्या त्यांच्या चित्रपटात कॅनडातील एक छोट्या गावात स्कूल बसच्या अपघातात अनेक मुले मृत्युमुखी पडतात. एक वकील त्या गावातील लोकांसाठी विशेषत: ज्यांची मुले त्या अपघातात वारली त्यांना मदत करण्यासाठी येतात. परंतु त्यामुळे त्या छोट्या गावातील सर्वांचेच जीवन ढवळून निघते. दिग्दर्शकाने एका फार मोठ्या शोकांत अनुभवातूनसुद्धा एक आशेचा सहवेदनेचा फुंकर घालणारा सुर लावला आहे ते पहाण्यासाठी अवश्य या. 1997 मध्ये कॅनडा येथे प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचा कालावधी 112 मिनीटांचा आहे.

‘द स्वीट हिअर आफ्टर’ हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.

मेडिकल कॅम्प मध्ये तब्बल ७५ मुलांची आरोग्य तपासणी

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सृजन विभागातर्फे आज मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. मेडिकल कॅम्प मध्ये ७५ मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सृजन विभागाकडून मुलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

२०१७ सालाकरिता सतीश सिडाम व कृपाली बिडये सामाजिक पुरस्कार तर मोहम्मद नुबैरशहा शेख, किशोरी शिंदे क्रीडा पुरस्कार, आकाश चिकटे विशेष क्रीडा पुरस्कार मानकरी, दि. १५ जानेवारी २०१८ रोजी खा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पुणे येथे पुरस्कारांचे वितरण

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या नवमहाराष्ट्र युवा अभियानातर्फे दरवर्षी दिल्या जाणा-या ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा सामाजिक व क्रीडा पुरस्कार २०१७’ ची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी युवा आंदोलनाच्या क्षेत्रात विधायक व रचनात्मक काम करणा-या युवक-युवतींना सामाजिक युवा पुरस्कार देण्यात येतो तसेच महाराष्ट्रातील उत्कृष्ट खेळाडूंच्या कार्याचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा आणि प्रोत्साहन मिळावे हे क्रीडा पुरस्काराचे उद्दिष्ट आहे. पुरस्काराचे यंदाचे एकोणिसावे वर्ष आहे. सदरील पुरस्कारांचे वितरण सोमवार दि. १५ जानेवारी २०१८ रोजी कल्चरल सेंटर, सिंह्गड इन्स्टिट्यूट कॅम्पस, सिंह्गड रोड, वडगाव, पुणे येथे नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या निमंत्रक व प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे, प्रतिष्ठानच्या विभागीय केंद्राचे अध्यक्ष श्री. अजित निंबाळकर व इतर मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. सन २०१७ सालचा‘यशवंतराव चव्हाण विशेष युवा क्रीडा पुरस्कार’ भारतीय हॉकीपटू आकाश चिकटे (हॉकी) यांना प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप ५१ हजार रुपये रोख, सन्मानपत्र असे आहे. या वर्षीचा ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा क्रीडा पुरस्कार – युवक व युवती’ क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल मोहम्मद नुबैरशेख (बुद्धिबळ) व किशोरी शिंदे (कबड्डी) यांना तर सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सतीश सिडाम (ताडोबा वनक्षेत्रात आदिवासी हक्कासाठी कार्यरत) व कृपाली बिडये (हिजडा आणि ट्रान्सजेन्डर समूहासाठी कार्यरत)यांना ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा सामाजिक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
सामाजिक व क्रीडा युवा पुरस्कारांचे स्वरूप प्रत्येकी २१ हजार रु. रोख, व सन्मानपत्र असे आहे.
यासोबतच प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात येणाऱ्या यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय महाविद्यालयीन नियतकालिक स्पर्धेचा निकालही जाहीर झाला असून यात कर्मवीर रामरावजी आहेर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, देवळा, जि. नाशिक यांच्या ‘बांधिलकी’ या नियतकालिकास प्रथम पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप रु. १० हजार रोख, प्रमाणपत्र असे आहे. Nagesh Karajagi Orchid College of Engg. & Tech., जि. सोलापूर यांच्या ‘Orchid Aura – 2017’ नियतकालिकास द्वितीय पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप रु. ७ हजार रोख, प्रमाणपत्र असे आहे. विद्याभारती महाविध्यालय, अमरावती यांच्या ‘प्रतिभा’ नियतकालिकास तृतीय पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप रु. ५ हजार रोख, प्रमाणपत्र असे आहे. तर नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला आणि वाणिज्य व विज्ञान महाविध्यालय, जि. नाशिक यांच्या ‘नक्षत्र-भारतीय स्वातंत्र्याची ७० वर्ष’ या नियतकालिकास तरराधाबाई काळे महिला महाविध्यालय, अहमदनगर यांच्या ‘माई’ नियतकालिकांस उत्तेजनार्थ पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी रु. ३ हजार रोख, प्रमाणपत्र असे आहे. वरील सर्व पुरस्कार्थीचे नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या राज्यस्तरीय कार्यकारी समितीने अभिनंदन केले आहे.

Wednesday 3 January 2018

एकदिवसीय चित्रपट रसग्रहण शिबिर उत्साहात संपन्न

जानेवारीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची नांदी म्हणून यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, पु. ल. अकादमीच्या सहयोगाने २ जानेवारी, २०१८ ला रवींद्र मिनी थियेटरमध्ये एकदिवसीय चित्रपट रसग्रहण शिबिराचे आयोजन आयोजन करण्यात आले होते. ह्या शिबिरात प्रसिद्ध नाट्य/चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल व प्रसिद्ध व लोकप्रिय चित्रपट शिक्षण तज्ञ श्री. समर नखाते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला अधिक चित्रपट प्रेमींची उपस्थिती होती.
प्रतिष्ठानचे सरचिटणीस शरद काळे, नितीन वैद्य, चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल व प्रसिद्ध व लोकप्रिय चित्रपट शिक्षण तज्ञ श्री. समर नखाते आणि महेंद्र तेरेदेसाई, संजय बनसोडे, दत्ता बाळ सराफ आणि महेश चव्हाण इत्यादी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.