Tuesday 13 March 2018

एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता या विषयावर मान्यवरांचे मार्गदर्शन


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विकास अध्ययन केंद्र, कोरो मुंबई आणि कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता या विषयावर चव्हाण सेंटर मध्ये राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विद्याताई चव्हाण, निशा शिवूरकर, आशा भिसे, दीप्ती राऊत, सुरेश शेळके आणि महेंद्र रोकडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक रेणुका कड यांनी केले. तर एकल महिला कौटुंबिक, सामाजिक प्रश्न, उपजीविका आणि अर्थिक स्थिती या विषयावर आशालता देशपांडे, भाग्यश्री रणदिवे आणि राम शेळके यांनी मार्गदर्शन केले. 'एकल महिला आणि शासकीय योजना' या विषयावर विजय जाधव यांनी मार्गदर्शन केले. 'भटके विमुक्त समाजातील एकल महिला या विषयावर वैशाली भांडवलकर आणि पल्लवी रेणके त्यांना आलेले अनुभव उपस्थितांना सांगितले. 'एकल महिला आणि लैंगिक शोषण' या विषयावर मनीषा तोकले यांनी मार्गदर्शन केले. 'एकल महिलांच्या पाल्यांचे प्रश्न' या विषयावर करूणा महांतारे यांनी मार्गदर्शन केले. शहरी आणि ग्रामीण भागातील अविवाहीत एकल महिलांचे प्रश्न या विषयावर दिप्ती राऊत यांनी मोजक्या शब्दात मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला आलेल्या लोकांचे गट तयार करून चर्चा करण्यास सांगितले. त्यानंतर प्रमुख मार्गदर्शन निशा शिवूरकर यांनी केले तर अध्यक्षीय समारोप आमदार विद्या चव्हाण यांनी केले. पुढील कृती आराखडा आणि आभारप्रदर्शन दत्ता बाळसराफ यांनी केले.



No comments:

Post a Comment